महाराष्ट्र इलेक्शन रिझल्ट, गुलाल पुन्हा आपलाच. BJP

Thumbnail

अखेर विजय सत्याचाच झाला. सर्व लाडक्या बहिणी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व लाडके बंधू आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी भरभरून भाजपला मतदान केले आणि आपल्या लाडक्या उमेदवाराला जिंकवून दिले. हातचे सोडून पळत्याच्या मागे न लागता सर्वांनी भाजपवर पूर्ण विश्वास ठेवून मतदान केले. सत्तेच्या हव्यासापोटी काही पक्षांनी जास्त पैसे ऑफर केले, पण सर्व लाडक्या बहिणी व त्यांचे कुटुंबीय सर्व भाजपबाबत इमानदार राहिले. समाजातील सर्वच लोकांनी भरभरून मतदान केल्यामुळे, भाजपला बंपर बहुमत मिळालेले आहे. पुन्हा एकदा भाजपने इतर पक्षांची तोंडे बंद केलेली आहेत. काही विरोधी पक्षांचे नेते म्हणताना दिसत आहेत की, हा scam आहे. जनतेला हा निकाल मान्य नाही, पण असे म्हणणाऱ्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. जनता आपल्याला का स्वीकारत नाही याचा त्यांनी अभ्यास करावा. भाषणांना गर्दी झाली याचा अर्थ असा नाही होत की जनता तुम्हाला पसंत करते. बहुतांशी लोक फक्त तुम्हाला प्रत्यक्षात बघण्यासाठीच तेथे आलेले असतात. टीका करणाऱ्यांनी काहीही बोलू देत, जनतेचा कौल स्पष्ट झालेला आहे. पुन्हा एकदा बंपर बहुमताने भाजप सरकार निवडून आलेले आहे. जय असो भाजपचा. सर्व काही जनतेच्या मनासारखेच झालेले आहे. आता सरकारकडे एकच मागणे आहे ते म्हणजे महागाईवर कंट्रोल आणावा आणि मुली व स्त्रियांना संपूर्ण सुरक्षितता द्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post